प्रतिनिधी / सेनापती कापशी
कागल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत ६२.३० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सकाळपासूनच महिला मतदारांनी आघाडी घेतली असून ३५ हजार ८३९ दीड वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
तर ३५ हजार २८६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरु आहे. मोठ्या ग्रामपंचायतीच्या लढतीत मात्र जोरदार चुरस आहे.









