केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती
नवी दिल्ली
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी कांद्याच्या सद्यस्थितीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आत्तापर्यंत सुमारे 18 हजार टन कांद्याची आयात करण्यात आली आहे. मात्र, सर्व प्रयत्नानंतर फक्त 2 हजार टन कांद्याची विक्री झाली आहे. दरम्यान, मोदी सरकारने सर्वांसाठी 22 रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून देला आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
2020 या वर्षासाठी कांद्याचा विशेष स्टॉक वाढवून 1 लाख टनापर्यंत करण्यात आला आहे. सरकारकडून नाफेडद्वारे कांद्याचा विशेष स्टॉक तयार केला जातो. 18 हजार टन आवक झालेल्या कांद्यापैकी फक्त 2 हजार टन कांद्याची विक्री झाली आहे. आसाम, महाराष्ट्र, हरियाणा आणि ओडिशा या राज्यांनी अनुक्रमे 10 हजार टन, 3480 टन, 3 हजार टन, 100 टन कांद्याची मागणी केली होती. मात्र, या राज्यांनी आयात केलेला कांदा खरेदी करण्यास नकार दिला आहे, असेही पासवान यांनी सांगितले.









