वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात 1000 रु., महाराष्ट्रातील तळेगावचा बटाटा 500 रु. तर आग्रा बटाटा 300 रुपयांनी वधारला. बेळगावचा मध्यम प्रकारात मोडणारा बटाटा 500 रु. वधारला तर लाल मातीतील चांगल्या प्रतीचा बटाटा 500 रु. कमी झाला. रताळी पिकाचे भाव आणि इंदोर बटाटय़ाचे भाव मात्र स्थिर आहेत.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील बाजारात 40 ट्रक कांदा आवक होती तर शनिवारी 30 ट्रक कांदा आवक होती. आवक कमी तर जावक वाढली याचा परिणाम कांदा दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी संभाजी होनगेकर यांनी दिली. बाजारात 30 ट्रक कांदा आवक होती. त्यामध्ये कर्नाटकामधून 12 ट्रक कांदा होता. यामध्ये 5 ट्रक नवीन कांदा आवक होती. महाराष्ट्रातून 18 ट्रक कांदा आवकही जुन्या कांद्याची होती. इजिप्तचा 1 ट्रक कांदा मागील बाजारात शिल्लक होता.
नवीन कांदा दर 1000 पासून 5000 पर्यंत
जुना कांदा दर 2000 पासून 7500 पर्यंत
सफेद कांदा 2500 ते 8000 पर्यंत
बाजारात शनिवारी परराज्यातील 12 ट्रक बटाटा आवक होती. तर मागील बाजारापेक्षा 7 ट्रक बटाटा आवक कमी होती. याचा परिणाम तळेगावचा बटाटा आणि आग्रा बटाटय़ाचे भाव वधारले तर इंदोरचा बटाटा स्थिर होता. बाजारात 12 ट्रक बटाटा आवकेपेक्षा इंदोरचा 6 ट्रक, आग्रा एक ट्रक तर तळेगावचा बटाटा 5 ट्रक इतकी आवक झाली असल्याची माहिती व्यापारी टी. एस. पाटील यांनी दिली.
बेळगाव बटाटा उत्पादक क्षेत्रामधून बटाटा काढणी मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाजारात जवारी बटाटा आवक वाढली आहे. शनिवारी बाजारात 4000 पोती इतकी बटाटा आवक होती. मागील बाजारापेक्षा 2500 पोती जादा आवक होती. याचा परिणाम चांगल्या प्रतीचा बटाटा 500 रुपयांनी कमी झाला. तर जवारी मध्यम प्रकारचा बटाटा, उन्हाळी बटाटा लागवडीसाठी शेतकरी बांधव खरेदी करत आहेत. याचा परिणाम बटाटा दरात 500 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी संदीप मुंगारी यांनी दिली.
बाजारात मोठय़ा प्रमाणात रताळी आवकसुद्धा वाढत आहे. बेळगाव व चंदगड तालुक्यामधून मोठय़ा प्रमाणात तर खानापूर तालुक्यामधून तुरळक प्रमाणात रताळी आवक होत आहे. चांगल्या प्रकारच्या मलकापुरी रताळी पिकाला चांगली मागणी आहे. रताळीचा भाव 800 पासून 1300 रु. असा झाला तर सर्वसाधारण रताळी पिकाचा भाव 700 पासून 1000 रु. असा झाला असल्याची माहिती व्यापारी चेतन खांडेकर यांनी दिली..









