प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
वेंगुर्लेच्या सुकन्या आणि माजी शिक्षिका श्रीमती कांचन सामंत-कुलकर्णी यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. श्रीमती कांचन सामंत या इंग्रजी विषयाच्या लोकप्रिय व तज्ञ शिक्षिका म्हणून ओळखल्या जात. त्यांनी रेडी हायस्कूल, दाभोली हायस्कूल, वेंगुर्ले येथील गाडेकर कन्याशाळा व विवाहपश्चात कोल्हापूर येथील माध्यमिक विद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत अनेक विद्यार्थी घडवले. ‘तरुण भारत’चे जिल्हा मुख्य प्रतिनिधी शेखर सामंत व वेंगुर्ले येथील झारपकर फोटो स्टुडिओचे मालक आनंद सामंत, संजय सामंत व बाबल सामंत यांच्या त्या बहीण होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दीर व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वेंगुर्ले तालुक्मयात हळहळ व्यक्त होत आहे.









