बेटावर गेलेला कधी परतलाच नाही
एका गूढ बेटाबद्दल जाणून घेतल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. या बेटाचे नाव पलमायरा असून ते दीर्घकाळापासून शापित असल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी जाणारा व्यक्ती परतत नाही, पलमायरा बेटावर कुणीच राहत नाही.
पलमायरा बेटा अमेरेकच्या सामोउ हायवेवर आहे. हे बेट दीर्घकाळापासून शापित असल्याची वदंता आहे. या भीतीदायक ठिकाणावर एकही व्यक्ती दिसून येत नाही तसेच तेथे कुठल्याही आदिवासींच वास्तव्य नाही.
1978 पासून आतापर्यंत तेथे अनेक चित्रविचित्र घटना घडल्या आहेत. या बेटावरून जाणारी विमाने तसेच याच्या नजीकहून प्रवास करणारी जहाजे गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक लोकांनी या बेटावर नेमके काय घडतेय हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकलेले नाही.
या शापित बेटावर जाणारा व्यक्ती जिवंत परतत नसल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. या बेटावर गेल्यावर अनेक व्यक्ती परत आले नसल्याच्या अनेक नोंदी समोर आल्या आहेत. पण काही धाडसी लोक या बेटावरून परतल्याचा दावा करण्यात येतो. या बेटावर अनेक गूढ शक्तींचा सामना करावा लागल्याचे आणि तेथे एखादे भूतप्रेत असावे अशी जाणीव झाल्याचे या लोकांनी नमूद केले आहे. याचमुळे या बेटावर जाण्याचे धाडस फारसे कुणी दाखवत नाही.









