वार्ताहर / कसबा सांगाव
कसबा सांगाव ता . कागल येथील हुपरी रोड टेंभी शेजारील जवळपास ३० एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने छोटया छोटया गरीब शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे . वर्षभराची मेहनत आगीच्या भक्षस्थानी पडली. यामध्ये विठठल हजारे, नेमाण्णा हजारे ,धनराज गायकवाड ,यशोदा गायकवाड, अजित हजारे, महावीर कल्लाप्पा कांबळे, बेबीताई कांबळे, सचिन मोहिते, महानंदा प्रल्हाद कटी, नंदकुमार पोपट कांबळे, कुमार, राजेंद्र कांबळे, बजरंग कांबळे, विद्याधर शिंदे ‘ आणाप्पा कांबळे बाबासो मोहिते भिमराव लबाजे आदिंसह अशी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या ऊस शेतकऱ्यांची नावे आहेत .
आग विझवण्यासाठी श्री. छत्रपती शाहू ऊस सह. साखर कारखान्याच्या अग्निशमनला पाचारण करण्यात आले होते. आग विझवण्यासाठी सर्वच शेतकरी वर्गाचे शर्तीचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत चालू होते.