दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग शहरालगतच्या कसईनाथ डोंगरावर आज भाविकांची मोठ्या प्रमाणावर रीक लागली होती. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या डोंगरावर आज गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदीं भागांतून मोठ्या संख्येने भाविक आले होते. ,या सर्वांनी पूजा अर्चेसोबत पर्यटनाचाही आस्वाद घेतला. विशेष म्हणजे वरूण राजानेही आज उसंत घेतली होती.









