प्रतिनिधी / शाहुवाडी
कष्टानं पिकवलं पण परतीच्या पावसाने हिरावून घेतलं मागणीच्या कालावधीतच शाहूवाडीच्या लाल मातीतील सोनं बाजारपेठेत पाठवण्यासाठी शेतकरी बांधवांची घालमेल सुरू झाली असून नवरात्र उत्सवात मागणी असणाऱ्या रताळी पिकाला परतीच्या पावसानं चांगलाच फटका बसला आहे.
शाहुवाडी तालुक्याच्या लाल माती निर्माण होणार लाल सोनं नवरात्र उत्सव काळात चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. मुंबई , वाशी पुणे त्याचबरोबर कोल्हापूरसह अन्य ठिकाणी रताळी पिकाला चांगली मागणी येत आहे. तीन महिन्याच्या या पिकाला चांगल्या पद्धतीने जपलं होतं आत्ता रताळी काढण्यास सुरुवात झाली आहे. नवरात्र उत्सव काळात या पिकाला अधिक मागणी आहे. मात्र चार दिवसापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांच्या समोर संकट उभा राहिले आहे.
एकूणच शाहूवाडीच्या लाल मातीतील हे लाल सोन परतीच्या पावसाने काढणे अभावी काही ठिकाणी शेतातच राहत आहे. तर काढतानाही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी शेतकरी बांधवांच्यासमोर पुन्हा एकदा आर्थिक फटका बसू लागला निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरीही आता हतबल झाले असून, अधिक चांगला दर मिळेल या आशेवर असलेल्या शेतकर्यांच्या हातात पुन्हा एकदा निराशेचं दान पडलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









