उस्मानाबाद / प्रतिनिधी
कळंब नगर पालिकेतील उपाध्यक्ष संजय पाडुरंग मुंदडा, नगरसेवक सौ.गिता महेश पुरी व नगरसेवक लक्ष्मण मनोहर कापसे यांनी कळंब नगरपालिकेतील गटनेते पदासाठी पक्षाच्या सुचनेशिवाय व परवानगी शिवाय बैठक आयोजित करणे व जिल्हाध्यक्ष तसेच पक्षश्रेष्ठी यांनी भ्रमणध्यनी दवारे बैठक रद्द करण्याच्या सुचना देऊन देखील इतर नगरसेवकांची दिशाभुल करुन पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही करणे आवश्यक असल्याने आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीची बैठक घेवुन वरील तिघांना 1 वर्षासाठी निलंबीत करण्याचा निर्णय घेतला असुन प्राथमिक पक्ष सदस्यत्य कायमचे रद्द का करु नये अशी कारणे दाखवा नोटिस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दि. 15/12/2020 पासुन वरील तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य पुढील वर्षाभरासाठी पक्षाचे प्राथमिक सदस्य असणार नाहीत.








