प्रतिनिधी / पणजी
कळंगुट येथे सौझा लोबो यांच्या रेस्टॉरंटवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सेवा बजावताना कायदा सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल कळंगुट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी निरीक्षक लक्षी आमोणकर यांना रुजू व्हायला सांगण्यात आले आहे.
कळंगूट पोलीस स्थानकात एलआयबीचे काम पाहणारे पोलीस शिपाई विनय श्रीवास्तव यांना पोलीस मुख्यालय पणजी येथे नेण्यात आले आहे.









