बेळगाव : येथील कलाश्री बंबतर्फे आयोजित लकी ड्रॉमधील नवव्या सोडतीचा मान पिरनवाडीचे नारायण मुचंडीकर यांना मिळाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम. वाय. माळवी, अमित नाईक, शेखर बसुर्तेकर, दत्तात्रय रायकर, रविंद्र हुंदळेवाडकर, प्रभाकर कुंडेकर उपस्थित होते. कलाश्रीचे संचालक प्रकाश डोळेकर प्रास्ताविकात म्हणाले, ज्या लकी ड्रॉ सभासदांना लग्नसराईसाठी कोणतीही वस्तु आगावू हवी असल्यास पुढील शिल्लक हप्त्याची रक्कम भरून घेऊन जाऊ शकता. तसेच किराणा साहित्य रुपये 3000 पैकी प्रती महिना रुपये 500 ची खरेदी करू शकता. तसेच खास आपल्यासाठी होम ऍप्लायन्सीस, इलेक्ट्रीक वस्तू, कलाश्री बंब (बॉयलर), कलाश्री सोलार वॉटर हिटर तसेच लाकडी फर्निचरवर 5 टक्के ते 45 टक्के डिस्काऊंट मिळेल, असे म्हणाले.
तसेच बाकीचे सहा विजेते जी. आर. कट्टी,(चन्नम्मानगर), संतोष पाटील (निलजी), सुभाष इस्त्रांनी(नागरगाळी), उमा मोरे (चिक्कोडी), परशुराम मरगुंदकर(बाकनूर), रक्षिता असनोटकर (हिंदवाडी) यांना इस्त्री भेट म्हणून देण्यात आली.









