प्रतिनिधी /पणजी
कला अकादमी आयोजित 46 व्या राज्यस्तरीय आर्टिस्ट विभागातील स्पर्धात्मक कलाप्रदर्शनाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पेंटिंग व ग्राफ्ढाrक प्रिंट विभागातून स्वप्नेश वायंगणकर, वासुदेव उदय शेटय़े व आशिष उल्हास फ्ढळदेसाई यांची निवड झाली. अप्लाईड आर्ट व ग्राफ्ढाrक डिझाईनमध्ये संदेश गवंडळकर, राजाराम शिवराम नाईक व राजतिलक नाईक यांची निवड झाली. स्कल्पचर विभागातून उमाकांत तुकाराम पोके, सागर नाईक मुळे व प्रशांत आनंद नागेशकर यांची निवड झाली आहे. यांच्या कलाकृतीना प्रत्येकी 20,000/- रुपयांची पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
झिलू हरमलकर (डिचोली), विनय सायनेकर (मिरामार), डॉ. शिवाजी शेट (कुंभारजुवे) या तज्ञाांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाने राज्यकला प्रदर्शनासाठी आलेल्या कलाकृतीचे मूल्यमापन करून निकाल दिला आहे.
पारितोषिक प्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल, असे कला अकादमीने कळविले आहे.









