बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६,३७८ रुग्ण सापडले आहेत. तर २१,१९९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २६,३५,१२२ वर पोहोचली आहे. तर २३,१२,०६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे २,९३,०२४ सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे एकूण ३०,०१७ रुग्णांचा बळी गेला आहे. यापैकी बुधवारी ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.७४ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.१३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात बुधवारी ४,०९६ रुग्ण सापडले आहेत. तर ८,६२० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बुधवारी जिल्ह्यात कोरोनामुळे ३०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३,९२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची सांख्य ११,७०,७४२ वर पोहोचली आहे. तर १०,१७,९४२ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान बेंगळूर शहरात सध्या १,३८,८७० रूग्ण उपचारात आहेत. बेंगळूर शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९४ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.१८ टक्के आहे.









