बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण १ मेपासून सुरू होणार होते. ही लस अजून कर्नाटकात आली नसल्यामुळे लसीकरण करण्यास उशीर होईल असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी म्हंटले आहे. भारत सरकारने १८ वर्षावरील लोकांना १ मेपासून लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्री सुधाकर यांनी राज्यात उद्यापासून १८ वर्षे ते ४४ वर्षे वयावरील व्यक्तींना लस देण्यास सुरु करणे आम्हाला शक्य नाही. ज्या क्षणी आम्हाला अधिकृत माहिती मिळेल, आम्ही आपल्याला सांगू,” असे ते म्हणाले.
“आम्ही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला एक कोटी डोससाठी ऑर्डर दिले आहेत परंतु अधिकृत बातमी अशी आहे की उद्यापासून ते आम्हाला नियोजित वेळापत्रकानुसार देण्यास तयार नाहीत,” असे मंत्री सुधाकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या लोकांना को-विन पोर्टलवर स्वतःची नावनोंदणी केली आहे त्यांना १ मे रोजी लसीकरण केंद्रांवर जाण्यास टाळायला सांगितले.