बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये सोमवारी १,५०९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या १,६४५ होती. तर राज्यात सोमवारी एकूण २४ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११,६७८ लोक मरण पावले आहेत. राज्यात सध्या २४,७०८ कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान राज्यात सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. सोमवारी जिल्ह्यात ७२५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्याच वेळी, बेंगळूरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १८,४०९ वर पोहचली. जिल्ह्यात सोमवारी ४७८ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे ४,०७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









