बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. राज्यात बुधवारी नवीन कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या वर गेली. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनांशी राज्य सरकार चिंतेत आहे. राज्यात क्लोजडाऊन करूनही रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी राज्यात नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ५०,११२ वर गेली. तर राज्यात कोरोनावर मात करून २६,८४१ रुग्ण घरी परतले. राज्यात सकारात्मकतेचा दर ३२.२८ टक्क्यांवर गेला. दरम्यान, राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ४,८७,२८८ वर गेली आहे. राज्यात बुधवारी मृतांची संख्या वाढली. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३४६ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार बुधवारी राज्यात कोविडमुळे एकूण १६,८८४ रुग्णांचा मृत्यू झाला.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात २३,१०६ नवीन प्रकरणांची नोंद झाली. तर ८,८४७ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परत आले आहेत. जिल्ह्यात २४ तासात १६१ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे.









