बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना लसीचे या महिन्यात ६० लाखाहून अधिक डोस देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिली.
येडियुरप्पा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आतापर्यंत १.४१ कोटी डोस दिले गेले आहेत, तर या महिन्याच्या अखेरीस कर्नाटक दोन कोटी लसीकरण पूर्ण करेल,” तसेच कर्नाटकच्या लसीकरण मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “सतत पाठिंबा” दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकला जून महिन्यात केंद्राकडून ४५ लाख डोस मिळणार आहेत. राज्य सरकार थेट १३.७ लाख डोसची खरेदी करेल. केंद्र सरकार कर्नाटकला कोविशील्डचे ३७,६०,६१० डोस आणि कोव्हॅक्सिनचे ७,४०,१९० डोस देईल. दरम्यान, कर्नाटक सरकार थेट कोविशील्डचे १०,८६,०९० डोस आणि कोव्हॅक्सिनचे २,८४,७६० डोस खरेदी केले जातील.
दरम्यान, लसीची ही आकडेवारी सांगत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष म्हणाले, “जिल्हा निहाय लसीचे योग्य वाटप करण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यानंतर येडियुरप्पा यांनी काही तासानंतर याविषयी ट्विट केले.