बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात लॉकडाऊननंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. राज्यात कडक निर्बंधांमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. राज्यात गेल्या तासात १,५०१ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. याचवेळी राज्यात २,०३९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले . तर मंगळवारी ३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात मंगळवारी चाचणी पॉझिटिव्हिटी दर १.४६ टक्के होता, तर केस मृत्यु दर (सीएफआर) २.१३ टक्के होता. दरम्यान, राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजारांवर पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८.९७ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८.३८ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,४३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २२,४८७ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ३५४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ४८४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.