बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महिन्यांत राज्यात १०,२५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
टीवीवच्या माध्यमातून येडीयुरप्पा यांनी कर्नाटक हे गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे आणि एप्रिल -2020 च्या तिमाहीत देशातील सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षित केलं आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्यांत राज्यात १०,२५५ कोटी ($१३५०m दशलक्ष डॉलर्स) ची गुंतवणूक झाल्याचे सांगितले आहे.
कर्नाटक हे संशोधन आणि नवीन उपक्रमांचे पॉवर हाऊस आहे. शहरी गतिशीलता ते सॅटेलाइट तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीपर्यंत वृद्धिंगत वास्तवापर्यंतच्या विविध क्षेत्रातील कर्नाटक स्टार्टअप्सने १५ राष्ट्रीय स्टार्टअप अवॉर्ड जिंकले ही अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.









