बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बुधवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यात गुरुवारी ५५० नवीन बाधितांची भर पडली. तर दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ६४४ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान राज्यात एकूण कोरोना बाधितनाची संख्या ९,३७,९३३ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे एकूण १२,२०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान २८ जानेवारी रोजी संध्याकाळपर्यंत राज्यात एकूण ९,३७,९३३ कोविड-१९ पॉझिटिव्ह घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये १२,२०९ मृत्यू आणि ९,१९,५०३ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. राज्यात सध्या ६,२०२ रुग्ण उपचारात आहेत. तर यातील १५० रुग्ण आयसीयुमध्ये आहेत.