बेंगळूर/प्रतिनिधी
ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांनी गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील वृद्धाला मारहाण व्हिडिओ प्रकरणावरून न्यायालयात धाव घेतली होती. कलम ४१ ए अन्वये उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध बजावलेल्या नोटीसविरोधात त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवर आज सुनावणी झाली. यायला कोर्टाकडून त्यांना दिलासा देण्यात आला आहे. माहेश्वरी गुरुवारी चौकशीसाठी गाझियाबाद पोलिसांसमोर हजर होणार होते.
दरम्यान, कर्नाटक हायकोर्टाने ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्या याचिकेवर सुनावणी आज सुनावणी झाली. यावेळी कर्नाटक हायकोर्टाने ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांना अंतरिम दिलासा दिला, गाझियाबाद पोलिसांना त्यांच्याविरोधात कोणतेही कठोर पावले उचलू नयेत असे निर्देश दिले.
दरम्यान ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावर पोलिसांनी २४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांना चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यास सांगितले होते. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध बजावलेल्या नोटीसविरोधात एमडी मनीष माहेश्वरी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आणि कोर्टाने त्यांच्याविरोधात कोणतेही कठोर पावले उचलू नयेत असे निर्देश दिले.