बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात सोमवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली. सोमवारी कर्नाटकात ८३० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर २,१६४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. सोमवारी एकूण१० कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११,९५४ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.राज्यात सध्या १६,०६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान राज्यात सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. सोमवारी बेंगळूरध्ये ३६९ पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाली. तर १,५७६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. सोमवारी कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला. यासह आतापर्यंत जिल्ह्यात ४,२३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या १०,८५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.









