बेंगळूर / प्रतिनिधी
सीएमओ कर्नाटकने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असताना सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे, सध्या कर्नाटक सरकार १० हजार रुपये देते. कर्नाटक राज्य कर्मचारी संघटनेच्या मागणीनंतर फेस्टिवल अॅडव्हान्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात वित्त विभागाच्या आदेशानुसार आयएएस कॅडरसह सर्व कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी या आगाऊ रकमेसाठी पात्र असतील. एक कर्मचारी वर्षातून एकदा आगाऊ, बिनव्याजीचा लाभ घेऊ शकतो. ही रक्कम दहा महिन्यांत परत करावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याच्या अलीकडच्या निर्णयानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये, सरकारने मूळ वेतनाच्या २१.५ %वरून २४.५ % डीए वाढवला.









