बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अंतर्गत शिधापत्रिका धारकांसाठी तांदूळ-वितरण मशीन बसवण्याची योजना आखत आहे. सरकार ‘राईस एटीएम’ मशीन्स राज्यभरात विविध ठिकाणी बसविणार आहे.
कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी ज्यांना रेशनकार्ड आहेत त्यांना चोवीस तास तांदळाची उपलब्धता मिळावी यासाठी रईस एटीएम बसविण्यात येतील आणि रेशन दुकानांसमोर लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही.
राईस एटीएम स्थापित करण्याची कल्पना व्हिएतनाम आणि इंडोनेशियातून आली आहे. जिथे कोरोना लॉकडाऊन दरम्यान अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना मोफत तांदूळ उपलब्ध करुन देण्यासाठी तांदूळ-वितरण मशीनची निर्मिती केली, असे ते म्हणाले.
तसेच मंत्री के. गोपालय्या यांनी संकल्पनेची तपासणी करण्यासाठी राज्यात दोन तांदळाचे मशीन स्थापित केले जातील, नंतर प्रकल्प यशस्वी झाल्यास तेच राज्यभर वाढविण्यात येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.









