बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शिवमोगा येथे झालेल्या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली.
गुरुवारी शिवमोगा जिल्ह्यातील एका गावात खाणीत झालेल्या जिलेटीनच्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल,” असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच लवकरच घटनास्थळी भेटदेणार असल्याचेही ते म्हणाले.
तसेच, बेकायदेशीर खाणकाम सरकारकडून काटेकोरपणे हाताळले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आम्ही तपासणी अहवालाच्या आधारे कारवाई करू. राज्यातले सर्व अवैध खनन थांबवू, असेही त्यांनी म्हंटले आहे.









