बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपचे आमदार मुनिरत्न यांचा मंत्रिमंडळातील समावेश नाकारल्यानंतर दुसर्याच दिवशी, आर. आर. नगरच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावत आमदारांना मुहयमंत्र्यांवर तक्रार करण्यास टाळायला सांगितले.
मुनिरत्न यांनी पक्ष किंवा नेत्यांविषयी वाईट बोलणे योग्य नाही. अशा प्रकारची वक्तव्य करणे योग्य नाही असे ते म्हणाले. पक्षातील आमदारांनी “गोंधळात टाकणारी विधाने” करणे टाळावे, असा सल्ला दिला. तसेच आम्ही लहान मुले नाही आणि अशा प्रकारच्या टीका चांगल्या वाटत नाहीत, असे मुनिरत्न म्हणाले.
भाजपचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत पुढील दीड-दोन महिन्यांत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले.
मंत्रिमंडळातील आश्वासन देऊनही मुनिरत्न यांचे नाव अंतिम यादीतून वगळल्यानं काही आमदारांनी टीका केली होती. याविषयी स्पष्टीकरण देताना त्यांनी ण आमदारांविरोधात झालेल्या निवडणुकीच्या घोटाळ्याच्या प्रलंबित प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपद दिलेले नाही.