बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बेंगळूर येथील मणिपाल इस्पितळात दाखल दाखसल करण्यात आले होते. सोमवारी मुख्यमंत्री येडियुरपा हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 77 वर्षीय येडियुरप्पा 2 ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.
मणिपाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा उपचारानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे म्हंटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून, मी बरे होण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्या सर्वांचे आभार. मला दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे आणि काही दिवस मी अलग राहणार आहे. आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद. मी लवकरच आपल्या सेवेत येत असल्याचे म्हंटले आहे.









