बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे कृषिमंत्री बी. सी. पाटील आणि त्यांच्या पत्नीला लसीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करून निवासस्थानी जाऊन कोव्हीड -१९ लस दिली होती त्या आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
२६ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात, आरोग्य व कुटुंब कल्याण आयुक्त डॉ. के. व्ही. थ्रीलोक चंद्र यांनी सांगितले की, कर्तव्यदक्षतेच्या नियमाविरुद्ध काम केल्याने हावेरी जिल्ह्यातील हिरेकरुरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. झेड आर मखंदर यांना निलंबित केले आहे. या आदेशात असे म्हटले आहे की वारंवार प्रशिक्षण व सूचना देऊनही त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या घरी देण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोग्य अधिकाऱ्याला परवानगीशिवाय कामाची जागा सोडू नका असे निर्देश देण्यात आले आहेत.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि ४५-६० वर्षे वय असणाऱ्या लस घेण्यास परवानगी मिळाल्याच्या दुसर्या दिवशी, मंत्र्यांनी सपत्नीक २ मार्च रोजी आपल्या निवासस्थानी ही लस घेतली होती. लस घेतल्यानंतर, मंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर फोटो पोस्ट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल व्यापक टीका करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनीही निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. (पीटीआय)