बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे सहकारमंत्री एस.टी. सोमशेकर यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमाशेकर हे बेंगळूरमधील यशवंतपूरचे आमदार आहेत.
मंत्री सोमशेकर यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.









