बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फटाके फोडण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश लवकरच जाहीर केला जाईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे.
कर्नाटक सरकारने या दीपावलीत फटाक्यांवर बंदी घालणार आहे, कारण याआधी कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञ समितीने वर्तविली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.
दरम्यान राज्यात फटाके फोडण्यास बंदी घालणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. या संबंधित आदेश लवकर जरी केला जाणार आहे.
फटाके फोडण्यावर बंदी घालण्याविषयी गुरुवारी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राज्यातील कोरोना तज्ञ समिती आणि तांत्रिक सल्लागार समिती यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी समितीने कोरोनामुळे दीपावली दरम्यान फटाक्यांवर बंदी घालायच्या फायद्याविषयी आणि बाधक गोष्टींवर विचार विनिमय केला आणि त्यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याची शिफारस केली.









