बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ३ नोव्हेंबर येत्या आठवड्यात सीरा आणि राजाराजेश्वरी नगर मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
बेंगळूरच्या आर. आर. नगर (राजराजेश्वरीनगर) आणि तुमकूरच्या सीरा मतदार संघाच्या जागांसाठी येत्या आठवड्यात मतदान होईल. दरम्यान १० नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पक्षाच्या उच्च नेत्यांशी चर्चा करून मंत्री म्हणून पदोन्नती देणाऱ्या आमदारांची यादी अंतिम होईल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा, हे मंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतील असे येडियुरप्पा यांनी सांगितले.