बेंगळूर/प्रतिनिधी
देशभरात लवकरच कोरोना लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक राज्यात सर्वप्रथम कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. दरम्यान राज्यातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ होण्याआधी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६.३लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच देशव्यापी लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाईल, असे म्हंटले आहे.
राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह दर न कमी कमी होत आहे. राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रशासन अजूनही योग्य ती घाबरदारी घेत आहे. याचाच एक भाग म्हणजे राज्यात कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरु होईल. यापार्श्वभूमीवर सुधाकर यांनी लसीकरण मोहीम लवकरात लवकर राबविण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. सरकारी रुग्णालयांतील तब्बल २,७३,२११ आरोग्य कर्मचारी आणि खासगी आरोग्य सेवांमध्ये आणखी ३,५७,३१३ डॉक्टरांची पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाईल,असे ते म्हणाले.
आरोग्यमंत्री सुधाकर यांनी या प्रक्रियेसाठी ९,८०७ अनुभवी कर्मचारी परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले असून राज्यभरात २८,४२७ लसीकरण केंद्रे ओळखली गेली आहेत. हे सर्व डेटा केंद्र सरकारने तयार केलेल्या कोविन सॉफ्टवेयरमध्ये समाविष्ट केले आहे, असे ते म्हणाले.









