बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार ७ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान सकाळी १० वाजता दरोडेखोरांनी दगडफेक केल्यामुळे सुमारे ६२ राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्याबसचे नुकसान झाले आहे.
कर्नाटकच्या रस्ते वाहतूक महामंडळाच्या कामगारांनी ६ व्या वेतन आयोगानुसार पगाराची पध्दत लागू करावी, या मागणीसाठी कर्नाटक रस्ता वाहतूक महामंडळातील कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा आजचा नऊवा दिवस आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचार्यांच्या पुढाकाराने बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी), कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (केएसआरटीसी), उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनडब्ल्यूकेआरटीसी) आणि ईशान्य कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनईकेआरटीसी) चे कामगार या संपत सहभागी आहेत. दरम्यान परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी अनिश्चित संप पुकारला आहे.









