बेंगळूर/प्रतिनिधी
केवळ “ग्रीन” प्रकारात मोडणाऱ्या फटाके विक्रीला कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलाने कठोर कारवाई करून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईचे नियोजन केले आहे.
चिक्कबळ्ळापूरचे पोलीस अधीक्षक जी.के. मिथुन कुमार यांनी फक्त हिरवे फटाके विकणाऱ्यांना पोलीस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देतील. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.
तसेच, नागरिकांनी खरेदी करण्यापूर्वी पडताळणी करून फक्त हिरवे फटाके खरेदी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक बॉक्सवर एक लोगो आणि एक क्यूआर कोड उपलब्ध असेल. हिरव्या क्रॅकर्सची सत्यता तपासण्यासाठी हे स्कॅन केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बेंगळूर शहर पोलिसातील वरिष्ठ पोलिसअधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंची तपासणी करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. नॉन-ग्रीन फटाके विक्री करणार्यांवर स्फोटक कायद्याच्या संबंधित कलमानुसार कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे ते म्हणाले.









