बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु नवीन मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा आणि मंजुरी घेण्यासाठी बोम्माई दिल्लीत आहेत. त्यांनी आज हायकमांडकडून नवीन मंत्रिमंडळ निवडीला ग्रीन सिग्नल मिळणार असल्याचे सांगितले आहे.
आजच दुपारी शपथविधी
दरम्यान, बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या नवनियुक्त मंत्रिमंडळ आज दुपारी २.१५ वाजता शपथ घेतली जाईल, अशी अधिकृत माहिती मिळाली आहे. शपथविधी सोहळा बेंगळूरमधील राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये होणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत नवीन मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, मंत्रिमंडळ रचनेवरील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि त्यांना बुधवारी भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळेल.