बेंगळूर/प्रतिनिधी
जेडी-एसच्या प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या सीरा विधानसभा जागेसाठी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि परिवाराने पूर्ण ताकद लावली आहे. या मतदारसंघात पक्षाला पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी स्वत: माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पुढाकार घेतला आहे. देवेगौडा यांनी बुधवारी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला.
निवडणुकीच्या शेवटपर्यंत ते सीरा जवळ मधुगुरी येथे पक्षाच्या नेत्याच्या घरी थांबतील असे देवेगौडा यांनी सांगितले. तसेच देवेगौडा सोडून त्यांचे दोन मुले माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि एच.डी. रेवन्ना हेही सीरा येथे निवडणूक प्रचार करत आहेत. प्रचाराविना कोणताही परिसर राहू नये म्हणून दोघांनीही विभाग वाटून घेतला आहे.
प्रचारादरम्यान देवेगौडा यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पोटनिवडणूक एक आव्हान आहे आणि आम्ही ते स्वीकारले आहे. मी 1 नोव्हेंबरपर्यंत इथे आहे आणि पोटनिवडणुकीची मोहीम संपल्यानंतरच परत जाईन. देवेगौडा यांनी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी चुकीचे मार्ग अवलंबले आणि आमच्या नेत्यांना भुलवण्यात यश आले. ते आमचा प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्यांना विश्वास आहे की जनता आणि कार्यकर्ते त्यांना समर्थन देतील असे ते म्हणाले.
जेडी-एस जिवंत ठेवण्याचे आवाहन
देवेगौडा यांनी भाषणादरम्यान भावुक झालेले पाहायला मिळाले. जेडी-एसला जिवंत ठेवण्याचे आवाहन करीत त्यांनी ते शेतकरी व जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहेत असे म्हणाले, जर तुम्ही आमची पार्टी जिवंत ठेवण्यास मदत केली तर ते कधीही विसरणार नाहीत. या प्रादेशिक पक्षाला उर्वरित लोकांसाठी संघर्ष करावा लागला आहे. बरेच लोक येऊन स्वत: ला शेतकरी म्हणतील. परंतु, मी अभिमानाने असे म्हणू शकतो की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी एक शेतकरी मुलगा म्हणून मरेन, असे ते म्हणले.बेंगळूरहून सीरा गाठलेल्या देवेगौडा यांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या.
.