बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने शेजारील राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्ट ची संख्या वाढत असल्याने कठोर पावले उचलली आहेत. कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना सरकारने कोरोना लस प्रमाणपत्र आणि कोरोना नकारातनक अहवाल बंधनकारक केलेला असताना, गुरुवारी राज्य सरकारने म्हटले आहे की, केरळमधून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना लसीचा किमान एक डोस घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर प्रमाणपत्र असेल तर प्रवाशांना नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल देण्यात सूट असेल असे म्हंटले आहे.
दरम्यान, केरळमधून येणाऱ्या लोकांवर राज्याने विशेष पाळत ठेवली आहे. केरळहून येणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष पाळत ठेवण्याच्या उपायांबाबतच्या आदेशानुसार, कोरोना लस कमीतकमी एक डोस घेतल्यास आरटी-पीसीआर प्रमाणपत्र दाखविण्यास सूट देण्यात येईल.