बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील इंग्लिश मीडियम स्कूलच्या असोसिएटेड मॅनेजमेंटने (केएएमएस) शिक्षण विभागाला डिसेंबर-जानेवारीपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. यासह खासगी अर्थसंकल्पातील शाळांचे प्रश्नही सरकारसमोर ठेवले आहेत.
शुक्रवारी सार्वजनिक शिक्षण विभागाचे आयुक्त अंबु कुमार यांना पत्र पाठवून, केएएमएसचे सरचिटणीस डी. शशिकुमार यांनी शैक्षणिक सत्र डिसेंबर-जानेवारी पासून सुरू झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे मुलांना परीक्षा न देता पुढच्या वर्गात पाठविणे देखील टाळता येऊ शकते. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. कोरोनाची दुसरी लाट आली तर शाळा सुरू होण्यास अतिरिक्त वेळ मिळेल.
शशिकुमार यांनी विद्यार्थी आणि कर्मचारी संक्रमित झाल्यास त्यांच्यावर नि: शुल्क उपचार करण्याची जबाबदारी घ्यावी असे ते म्हणाले. तसेच कमीत कमी वेळेत तपासणी अहवाल देण्याच्या सूचनाही कराव्यात. शाळा उघडल्यानंतर सरकारने सर्व खासगी विना अनुदानित शाळांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. सुरक्षा नियमांचे पालन करूनही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यास शाळा व्यवस्थापनस जबाबदार धरले जाऊ नये. सरकारने सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, डिजिटल थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर आणि सोडियम हायपोक्लोराइट इत्यादी सवलतीच्या दरात बनवावेत असे ते म्हणाले.









