बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये गुरुवारी ४७४ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यासह राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९,४१,०७० वर पोहोचली आहे. तर राज्यात गुरुवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात एकूण कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १२,२२७ झाली आहे. तसेच राज्यात उपचारानंतर एकूण ४७० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९,२२,९०७ वर पोहोचली आहे.
गुरुवारपर्यंत कर्नाटकात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ५,९१७ इतकी होती. त्यापैकी १४६ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. गुरुवारी कोविड पॉझिटिव्हिटी दर ०.६२ टक्के होता, तर या प्रकरणात मृत्यूचे प्रमाण ०.४२ टक्के होते.