बेंगळूर/प्रतिनिधी
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल. बेळगाव सुवर्णसौधऐवजी हे अधिवेशन बेंगळूरला होणार आहे, अशी माहिती कायदा व व संसदीय कार्यमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी दिली आहे. मधुस्वामी यांनी कोरोनामुळे हे अधिवेशन बेंगळूरला घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन ७ ते १५ डिसेंबर दरम्यान असणार आहे. यापूर्वी २१ ते २६ सप्टेंबर या कालावधीत विधिमंडळ कोरोना विषयक काळजी घेत पावसाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.