बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात रुग्णवाढीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांवर गेली आहे. राज्यात आतापर्यंत १,५१,४४९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ७४,६७९ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर २,८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची ७३,९५८ सक्रिय प्रकरणे आहेत.
बुधवारी राज्यात ५,४०७ रूग्णांनी कोरोनावर मात केली तर ५,६१९ नवीन रुग्णांची नोंद देखील झाली आहे. त्याच वेळी, राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाचे १८४८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात बुधवारी १०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या माहिती नुसार बुधवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १८४८, बळ्ळारी जिल्ह्यात ६३१, बेळगाव जिल्ह्यात २९३, म्हैसूर जिल्ह्यात २६१, दावणगिरी जिल्ह्यात २२४, धारवाड जिल्ह्यात १९९, कलबुर्गी जिल्ह्यात १९७, उडुपीमध्ये १७३, कोप्पळ जिल्ह्यात १५४, दक्षिण कन्नड़ जिल्ह्यात १४९, बागलकोट जिल्ह्यात १४९, हासन जिल्ह्यात १३७, चिकबळ्ळापूर जिल्ह्यात १२९, उत्तर कन्नड़ जिल्ह्यात १२५, मंड्या जिल्ह्यात १२२ कोरोना संक्रमितरुग्ण सापडले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









