बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात शनिवारी पाच निवडक जिल्ह्यात लसीकरण ड्राय रन सुरळीत पार पडले. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.के.सुधाकर यांनी कोरोना च्या लसीकरणासाठी कर्नाटक पूर्णपणे तयार आहे. शनिवारी झालेल्या ड्राय रनमुळे कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात मदत झाली आहे. यामुळे लसीकरण मोहिमेस मदत होईल. जानेवारीतच ही लस उपलब्ध होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
ड्राय रन लसीकरण दरम्यान शनिवारी त्यांनी येळहांका लसीकरण केंद्राला भेट दिली व ड्राय रनची पाहणी केली. यांनतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सुधाकर की कर्नाटकातील पाच जिल्ह्यात ड्राई रन कार्यक्रम पार पडला. या वेळी २५ जणांना लसी देण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
प्रथम कोरोना योद्धांना लस मिळणार
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पहिल्या टप्प्यात सर्व कोरोना योद्ध्यांना मोफत लस दिली जाईल. केंद्र लसीकरणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना व एसओपी जारी करेल. कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक्स, मानव संसाधन यासारख्या सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था केली जात आहे. तसेच देशात मोफत लसीकरण केले जाईल असेही त्यांनी शनिवारी म्हंटले आहे.
मंत्री सुधाकर यांनी राज्यात ब्रिटनहून परत आलेल्या दहा लोकांमध्ये व्हायरसच्या नवीन विषाणूची पुष्टी झाल्याचे सांगितले. त्या सर्वांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









