बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी राज्याचे राज्यपाल ल वजुभाई वाला यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच राज्य पालांसोबत राज्यातील कोरोना परिथिती आणि उपाययोजना याविषयी चर्चा झाली. यावेळी राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोविड -१९ चाचणी सुविधांना गती देण्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना केली.
राज्यपाल वजुभाई वाला यांनी राज्यातील सर्व बाधित भागात कोरोनव्हायरस नियंत्रित करण्यासाठी वेगवान चाचणी, आयुर्वेदिक औषध आणि होमिओपॅथी औषधाचा वापर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली आहे.