बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी विधानभ अध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश कुमार यांच्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोपकेले आहेत. भ्रष्टाचाराच्यामाजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश कुमार यांच्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर माजी मंत्री आणि आमदार के. आर. रमेश कुमार यांनी आघाडी सरकारच्या काळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर ते कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहेत. असे त्यांनी म्हंटले आहे.
पत्रकरांशी बोलताना रमेश यांनी ते कॉंग्रेस आणि जनता दल-एस यांच्या युती सरकारमधील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असल्याचे सांगत त्यांच्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचे म्हंटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे म्हणत त्यांनी राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे तपासात कोणताही अडथळा येणार नाही आणि मी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे.