बेंगळूर/प्रतिनिधी
बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणात एसीबीने नऊ दिवाणी अधिकाऱ्यांवर छापेमारी केली. मोठ्या प्रमाणात मालमत्ता साठवल्याप्रकरणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ११ जिल्ह्यातील नऊ अधिकाऱ्यांच्या संबंधित ठिकाणी छापेमारी केली.
एसीबीने २८ ठिकाणी छापे टाकले आहेत. रेंज एसपींच्या देखरेखीखाली एसीबीच्या ५२ अधिकारी आणि १७४ कर्मचार्यांच्या पथकाद्वारे छापा टाकण्यात येत आहे, असे एसीबीने सांगितले.
चिक्कबळ्ळापूर , बेळगाव, म्हैसूर, यादगिरी, बेंगळूर आणि दावणगिरी जिल्ह्यात छापे टाकण्यात येत आहेत.









