बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले की राज्य सरकारने एसएसएलसी परीक्षा आणि पीयूसी- द्वितीय परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, मंत्री एस. सुरेश कुमार म्हणाले, “वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु एसएसएलसी किंवा पीयूसी -२ परीक्षा रद्द करण्याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असे ते म्हणाले.
मंत्री एस. सुरेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार,मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, एसएसएलसी, पीयूसी -२ च्या रद्द होण्याबाबत माध्यमांनी वृत्त दिले होते. भविष्यात परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या अभ्यासावर भर द्यावा, असे ते म्हणाले.









