संशयितास अटक सुटका
प्रतिनिधी /म्हापसा
करासवाडा म्हापसा येथे मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान शुल्लक वाट देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात येथील नागरिक योगेश पाडलोस्कर याने तेथील रहिवासी आरिफ लंगोटी याच्यावर रागाच्याभरात गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी डोक्याच्या बाजूनी गेल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करासवाडा म्हापसा येथे आरिफ लंगोटी पेट्रोल पंप जवळच असलेल्या छोटय़ा वाटेतून बाहेर पडत असताना विरोधी दिशेने योगेश पाडलोस्कर आपल्या कारमधून येत असता गाडीचे चाक आरिफच्या पायावरून गेल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसन भांडणात होऊन तू तू मै मै करीत दोघामध्ये हाणामारी झाली. या दरम्यान योगेशने पिस्तोल काढून आरिफच्या डोक्याला लावले त्यावर योगेशची पत्नी तेथे आली व आरिफच्या कॉलरला पकडले व आपल्या कानपटीत लावले. नंतर योगेशने मारहाण केली व नंतर मुलगा यशने बाजूचा दगड काढून आरिफच्या डोक्यावर घातला असल्याची माहिती आरिफने दिली. सकाळी 9.30 वाजता हा प्रकार घडला. योगेशने दोनवेळा पिस्तोल शुट केले. एकदा खाली जमिनीवर व नंतर हवेत गोळीबार केल्याची माहिती आरिफने दिली.
दरम्यान भाग्यश्री पाडलोस्कर यांनी परस्पर तक्रार देत आपल्यास आरिफने मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. योगेश पाडलोस्कर याने परस्पर दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरिफ लंगोटी याने रस्त्याच्या मधोमध राहून रस्ता अडविला व पुढे जाण्यास दिले नाही. उलट आपली पत्नी भाग्यश्री हिला मारहाण करीत शिवीगाळ केली व ढकलले व कानपटीत लावले. नंतर आपला मुलगा यश पाडलोस्कर यालाही मारहाण केली.
म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी योगेश शइवा पाडलोस्कर, भाग्यश्री योगेश पाडलोस्कर, यश योगेश पाडलोस्कर (रा. करासवाडा म्हापसा) तसेच आरिफ गुडूसाब लंगोटी (रा. एकतानगर म्हापसा ) या चौघांविरोधात परस्पर तक्रारी दिल्या आहेत. सशस्त्र कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. म्हापसा येथील निरीक्षक निनाद देऊळकर हे याप्रकरणी उपअधीक्षक उदय परब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.









