तिघा हल्लेखोरोंचे मंडई परिसरात कृत्य
कराड / प्रतिनिधी :
कराड येथील मंडई परिसरात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून तीन हल्लेखोरांनी खून केल्याची घटना घडली.
जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 31 रा. कुरेशी मोहल्ला, कराड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भाजी मंडई परिसरातील एका सराफ दुकानासमोर तीन हल्लेखोरांनी जुबेर याच्यावर धारदार शस्त्राने पोटावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जुबेरचा यात मृत्यू झाला. पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. खुनाच्या घटनेने मंडई परिसरात खळबळ उडाली आहे.









