पाचवड फाटा, मालखेड फाट्यावर घटना
प्रतिनिधी/कराड
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाट्यावर ऊसतोड मजूरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन ऊसतोड मजूर ठार झाले. तर तीन मजूरांसह टेम्पोचालक असे चौघे गंभीर जखमी झाले. दरम्यान मालखेड फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. शनिवारी रात्री हे अपघात घडले.
राजू रामू राठोड (वय ३५) व खुबा किसन जाधव (वय ४७, दोघेही सध्या रा. वारूंजी, मुळ रा. आचरी तांदाळ, मुरूम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) अशी टेम्पोच्या धडकेत ठार झालेल्या ऊसतोड मजुरांची नावे आहेत. तर सुरज केशव राठोड, अमीत खुबा जाधव व राम मुन्ना राठोड या तीन मजूरांसह टेम्पोचालक अन्वर पठाण(वय30,ता.गोरवा,जि.बडोदा,गुजरात) हे गंभीर जखमी झाले. असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान
मालखेड येथील अपघातात दुचाकीस्वार
प्रितम गणपती पवार (वय
२८, रा. मालखेड
ता. कराड) हा
युवक ठार झाला आहे. दोन्ही
अपघाताची नोंद कराड शहर व कराड
ग्रामीण पोलिसात झाली आहे.
जखमींवर कराडच्या
खासगी रूग्णालयात उपचार सुरू
आहेत.








