प्रतिनिधी/ कराड
कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नव्याने नोंदणी होणाऱया दुचाकी वाहनांकरिता एम. एच. 50 टी ही नविन मालिका मंगळवार 23 पासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. पसंतीच्यया नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणारास प्राधान्य दिले जाणार आहे. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे विनोद सगरे यांनी कळविले आहे.








